News Heading :     * महाराष्ट्र शासनातर्फे महाविद्यालय गौरव

                          महाराष्ट्र शासनातर्फे जयक्रांती महाविद्यलाचा गौरव

 

राज्य शासनाच्या वतीने स्त्री – पुरुष समानता रुजवण्यासाठी जागर जाणिवेचा हा उपक्रम राज्यातील सर्व महाविद्यलयात राबवण्यात आला होता. जयक्रांती महाविद्यालयाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबदल जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पुरस्कार दिला आहे. मुंबई येथे खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार, प्राचार्या कुसुम पवार, अधीक्षक रामेश्वर स्वामी यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे उपस्थित होते.