News Heading :     जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यलायास राज्यस्तरीय तृतीय पारितोषीक

जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यलायास राज्यस्तरीय तृतीय पारितोषीक

आंतरविद्यापीठ रस्ता सुरक्षा अभियान २०१४-१५ अंतर्गत आयोजित स्पर्धेत येथील जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यलायास राज्यस्रीय तृतीय पारितोषीक मिळाले आहे. स्मृतिचिन्ह व रोख ७५ हजार रुपयांचे पारितोषीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाविद्यालयास प्रदान करण्यात आले. 
पुरस्कार वितरण सोहळ्यास नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपर पोलिस महासंचालक वाहतूक शाखा सुरेंद्र पांडे, नागपूरचे पोलिस आयुक्त के. के. पाठक, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक डॉ. अतुल साळूंके यांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार स्विकारताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विद्यासागर पंडित, सिनेट सदस्य प्रा. गोविंदराव घार, प्राचार्य कुसूम पवार, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. नागेश कांबळे, महाविद्यालयाच्या रासेयोचे सम्नवयक प्रा. प्रमोद चव्हाण, प्रा. राजाभाऊ पवार, प्रा. केशव अलगुले, प्रा. डॉ. चंद्रशेखर खाकरे, प्रा. अविनाश पवार यांची उपस्थिती होती. या अभियानात राज्यातील ३९ विद्यापीठांतील जवळपास तीन हजार महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अभियानांतर्गत रस्ता सुरक्षाविषयी प्रबोधन करणारे पथनाट्य, रॅली, मार्गदर्शनपर व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्लेकार्ड, पोस्टर प्रदर्शन, गर्दीच्या ठिकााणी जावुन भावनीक आवाहन करणारे पोस्टर्स, वाहतूक नियमांची पत्रके, गांधी टोपीद्वारे वाहतूकीचे नियम पाळा, अपघात टाळा, असे घोषवाक्य लिहीलेल्या गांधी टोप्यांचे वितरण करण्यात आले. 
या अभियानात प्रादेशिक परिवहन विभाग लातूरचे सहकार्य तर महामार्ग पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रकाश, दिनकर गावंडे, पोलिस निरीक्षक रोडगे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यातील तृतीय क्रमांकाचे पारितोषीक जयक्रांती महाविद्यालयास मिळाल्याबद्दल विद्यार्थी, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी रस्ता सुरक्षा समितीचे अभिनंदन केले.